काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कॅनेडियन ‘गँगस्टर’कडून जीवे मारण्याची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना कथितपणे धमकी दिल्याचं प्रकरण समोर येत आहे. शेख यांना थेट कॅनेडियन गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी आलीय.
गँगस्टर गोल्डी ब्रार बोलत असल्याचं सांगून एका कॉलरने अस्लम शेख यांना धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रविवारी बांगुर नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. ब्रार ज्याला सतिंदरजीत सिंह या नावाने ओळखलं जातं, तो एक फरार कॅनेडियन गँगस्टर आहे.
गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.
अस्लम शेख यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव आणि वकील विक्रम कपूर यांनी एफआयआर दाखल केला आहे. तेच आमदार शेख यांचे मोबाईल कॉल्स उचलतात. तक्रारीनुसार कपूर यांना ५ ऑक्टोबर रोजी शेख यांच्या मोबाईलवर फोन आला होता.
फोन करणाराने स्वतःला गोल्डी ब्रार असल्याचं सांगून अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दोन दिवसांना त्यांना गोळी मारुन ठार करेन, हे अस्लम शेख यांना सांगा.. असं त्याने फोनवर म्हटलं. त्यानंतर बांगुर नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….