राष्ट्रवादीचा संस्थापक कोण हे जगजाहीर :- शरद पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील बंडखोरांना टोला लगावला.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीस येत्या ६ ऑक्टोबरला वकिलासह उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करीत, भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादीत असूच शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
पवार हे शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी थांबले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
दिलीप वळसे-पाटील म्हणतात की, शरद पवार माझ्या हृदयात आहेत. यावर पवार म्हणाले की, ज्यावेळी मतदान करण्याची वेळ येईल, तेव्हा कोण कोणाच्या हृदयात आहे हे स्पष्ट होईल. कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यावर आपण भाष्य करणार नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….