१६ राज्याच्या प्रवासानंतर ३६ जिल्ह्याचा सायकल प्रवास ; प्रदूषण मुक्तीच्या संदेशा सोबत पर्यावरण रक्षण करा :- प्रकाश पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्वतःचे आरोग्य राखण्यासाठी सायकल प्रवास महत्त्वाचा आहे, यामुळे प्रदूषण मुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण करता येते असा मोलाचा संदेश 67 वर्षीय प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
सायकल चालवण्याची आवड जोपासत अगदी 67 वर्षाचे झाले असतानाही तरुणा सारखे 16 राज्याच्या सायकल प्रवासानंतर दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या प्रवासादरम्यान 16 जिल्हे पूर्ण करीत असताना पुसद या ठिकाणी भेट दिली आहे. शिवमल्हार फूटबॉल मित्रमंडळ , गिरीश डांगे , नितिन कानडे , गणेश जामकर , पंकज पाटील , परीक्षीत गडदे , विक्की राठोड , अविनाश राठोड , शुभम जमदाडे , राहूल मोरे , विशाल दातीर व समस्त शिवमल्हार मित्रमंडळ यांनी पुसद येथे
प्रकाश काशिनाथ पाटील यांचे आदरतिथ्य करित त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. पाटील यांचे जन्मगाव धुळे परंतु मागील 43 वर्षापासून पुणे येथे ते स्ताईक झाले आहेत. सायकल चालवण्याच्या छंदाला देशातील पर्यटन स्थळे आणि देवदर्शनाचा आनंद घेत आपल्या या सायकल प्रवासाला सोळा राज्याच्या यशस्वी सायकल वाऱ्या नंतर वयाच्या 67 वर्षानंतर मृत्यूपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र बघावा या संकल्प पूर्तीसाठी त्यांनी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील सौंदर्याचे व सुंदरतेचे आणि विविध ठिकाणच्या प्रेक्षणीय आणि प्रार्थना स्थळांना भेटी देत शहर गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांना सायकल चालवून पर्यावरण प्रेमींची संख्या वाढवण्यासाठी उपदेश संदेश देत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सायकल प्रवासासाठी पुसद वाशिम मार्गे पाटील पुढे निघाले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….