भाजप आमदारांना देणार खासदारकीचं तिकीट ; राज्यातील ‘या’ मंत्र्यांची नाव चर्चेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 2024 च्या लोकसभा निवडणूकीचे वेध सध्या संपूर्ण देशाला लागले असून राज्यातही सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातून एकूण ४८ खासदार निवडून येतात. यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
यातच भाजप आपल्या आमदारांना राज्यातून खासदारकीची तिकीट देईल असे म्हटले जात आहे. महाराष्ट्रातील सहा-सात आमदारांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवेल असे म्हटले जात आहे. मध्यप्रदेशमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना आमदारकीचे तिकीट देऊन भाजपने मोठी खेळी केली आहे.
अशीच खेळी भाजप महाराष्ट्रात खेळेल असे म्हटले जात आहे. फक्त राज्यात त्याचे उलटे होईल असे म्हटले जात आहे. भाजपचे दिग्गज नेते तथा राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आकाश फुंडकर , राम सातपुते, मंत्री रवींद्र चव्हाण, संजय केळकर याच्या नावांची सध्या चर्चा आहे.
शिंदेंचे आमदारांनीही लोकसभा निवडणुक लढवावी असा आग्रह भाजपचा असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपल्या मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना लोकसभेसाठी संधी द्यावी, असा आग्रह भाजपकडून केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..