प्रकाश आंबेडकरांचं ठरलं…! ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या सभांचं नियोजन वंचितकडून करण्यात येत असून याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा आंबेडकरांनी केल्या आहेत.
आंबेडकर म्हणाले की, वंचितच्या सभांना सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबरला लातूरला, ७ ऑक्टोबर सातारा, ११ ऑक्टोबर बीडला, २८ ऑक्टोबरला सटाणा येथे सभा होणार आहे. निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यादृष्टीने वंचित प्रचाराच्या सभा आयोजित करीत असल्याचं त्यांनी म्हटलं.
आंबेडकर पुढं म्हणाले की, धर्म आणि जात यावर राजकारण अडकवून ठेवलं आहे. सर्वांनी साथ दिली तर सामान्य जनतेला अशा राजकारणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जात धर्म व्यक्तिगत बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं. जीएसटीमधून साडेपाच लाख कोटी तिजोरीत येतात. यातून बेरोजगारी, शेतकरी समस्या नियोजन झाले तर इतर चर्चा न करता सर्व सामान्य माणसाच्या बेसिक गोष्टीवर लक्ष केंद्रित कसे होईल यावर आमचं लक्ष असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
दरम्यान कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी मतदान होईपर्यंत शांत रहा. काही सनातनी डोकी भडकवतील शांत रहा अस आवाहन करताना आंबेडकर म्हणाले आम्ही युती झाली नाही तर ४८ जागेवर निवडणूक लढवू. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच अकोला लोकसभा मी लढणार असल्याची घोषणाच आंबेडकरांनी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..