आक्रमक शिवसैनिकांनी धनंजय मुंडेंचा ताफा अडवला अन्….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लातूर :- लातूरमधील सोयाबीन संशोधन केंद्रासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. परळी येथून लातूर आजारी आईला घेऊन जाणाऱ्या धनंजय मुंडे ताफा शिवसैनिकांनी अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी काळे झेंडे न दाखवता फक्त निवेदन दिलं.
लवकरच मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले.
लातूर येथील प्रस्तावित सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवनी गोवंश संवर्धन केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाला लातूरमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि त्याचबरोबर अनेक संघटनेने विरोध केला होता. या निर्णयाविरोधात मागील काही दिवसापासून विविध आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनंजय मुंडे यांना लातूरत फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला होता.
आज धनंजय मुंडे हे परळी येथून लातूर विमानतळाकडे निघाले होते. त्यांच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. त्यांचा गाडीचा ताफा लातूर येथे आला असता आंदोलकानी ताफा अडवला. त्यांची परिस्थिती लक्षात घेत काळे झेंडे दाखवणे किंवा कसलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. यावेळी धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेऊ आणि त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ अस आश्वासन दिलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..