रणबावळे परिवाराला माजी बांधकाम सभापती मनीष भाऊ शहा व मित्र मंडळाकडून सर्वत्वपरी मदत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अतिवृष्टीमुळे विध्वस्त झालेल्या निंबी येथील बबनराव रणबावळे सौभाग्यवती पुष्पाताई रणबावळे परिवाराला मनीष भाऊ शहा व त्यांच्या मित्र मंडळाकडून सर्वत्वपरी मदत माणुसकीचे भिंतने दिला “निवारा” मनीष भाऊ शहा यांनी दिला “सहारा”, पुसद फार्मासिस्ट परिवार सोबत विविध संघटनेची मदत….
“कधी अडल्या नडल्याची हाक
तुमच्यापर्यंत पोहचत असेल,
तर ईश्वराचे आभार माना…
कारण तो समर्थ असतानाही,
इतरांच्या मदतीसाठी त्याने
तुमची निवड केलेली आहे…”
8 सप्टेंबर 2023 रोजी पुसद तालुक्यातील निंबी गावातील बबनराव रणबावळे पुष्पाताई रणबावळे या परिवाराचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले, देव बलवत्तर जिवितहानी झाली नाही,सर्वीकडे जलमय झालेल्या परिस्थितीमध्ये सर्व घरसंसार उपयोगी साहित्य भिजून गेले, ही बातमी कळताच पुसद माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव व त्यांचे सर्व सदस्य यांनी आवाहन करून बऱ्याच दानशूर व्यक्तीने ताबडतोब पैशाची व्यवस्था करून त्यांचे घर उभे करून दिले. ते सर्व खरं आहे आता घर म्हटल्यानंतर काय लागत नाही.. हा प्रश्न पडतो???
पावसामुळे चूल नष्ट झाली धान्य भिजले, भांडे अस्थविस्त झाले…. ही परिस्थिती माहीत होताच पुसद परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असणारे पुसद नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती मनीष भाऊ शहा यांना कळताच त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत तर दिलीच सोबत घरसंसार उपयोगी गादीसह संपूर्ण भांडे देऊन त्यांचा संसार पुनर्जीवित केला.
“25 सप्टेंबर फार्मासिस्ट डे” चे अवचित्य साधून पुसद फार्मासिस्ट परिवाराचे अध्यक्ष प्रशांत गावंडे यांनी सुद्धा सहकार्य करून आपला खारीचा वाटा तिथे उचलला.गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून या हेतूने वरील सामाजिक कार्याची माहिती सोशल मीडियावर टाकली आहे. यावेळी मनीष भाऊ शहा मित्र मंडळाचे सदस्य संजय पवार ,विशाल कांबळे,मनोहर बोंबले,कुणाल बनसोडे,गणेशराव वानखेडे ,प्रा.वसंतराव राठोड बाबूसिंग राठोड ,राजु मुराई बाळासाहेब देशमुख, अभिषेक गजभार हजर होते.
“सौ. पुष्पाताई रणबावळे या स्थितीग्रस्त महिलेचे मनोगत घेतले असता “आजपर्यंत आमच्याकडे कुकर नव्हता मनीष भाऊ शहा यांनी दिलेल्या घर संसारी उपयोगी साहित्यामध्ये आज कुकर दिसला” असे म्हणून तिने सर्वांचे आभार मानले…

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..