निसर्गप्रेमींच्या ‘मिशन ग्रीन’ला पुसदकरांचा उस्फुर्त प्रतिसाद ; भवानी माता टेकडी नटतेय हिरवाईने…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- माणसाने भौतिक प्रगती साधतांना निसर्गाचा अपरिमित ऱ्हास केला.परीणामी निसर्गचक्र बिघडुन पर्यावरणीय समस्या उभ्या झाल्यात.यावर असलेला एकमेव उपाय म्हणजे ‘झाडे लावणे व जगविणे’ हा मुलमंत्र निसर्ग प्रेमींनी अंगिकारला.त्याचा सुरेख प्रत्यय पुसद परीसरातील निसर्गप्रेमींच्या ‘मिशन ग्रीन’ या उपक्रमाद्वारे येतो आहे.
सविस्तर वृत्त असे की पुसद मधील सर्व निसर्गप्रेमी व मानवीय कार्य करणाऱ्या संघटनांनी मागील दोन महिन्यापासून निंबी पार्डी येथे “मिशन ग्रीन भवानी माता टेकडी” हा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत टेकडी हिरवीगार करण्याचा मानस आहे.टेकडीवर आत्तापर्यंत माणुसकीची भिंत व इतर वृक्षप्रेमी कडून सुमारे अडीच हजार झाडे देऊन लावण्या करिता मदत केलेली आहे.
या उपक्रमामार्फत टेकडीवरील रोडच्या दोन्ही बाजुंनी सहा ते आठ फुटाची जवळपास तिस झाडे लावण्यात आलेली आहेत.या सर्व झाडाला पाणी टाकण्याकरिता व गुरांपासून रक्षण करण्याकरिता एका मदतनीसची नेमणूक करण्यात आलेली आहे. दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेस आठ ते दहा निसर्गप्रेमींचा एक गट नियमित श्रमदान करून झाडाची पाहणी,आळे करणे व नवीन झाडे लावण्याचे कार्य करत आहेत.झाडे लावणे ही काळाची गरज आहे ही बाब ओळखून पुसद करांनी टेकडी हिरवाईने नटवायचे उत्कृष्ट कार्य हाती घेतले आहे.
ज्यांना जमेल त्यांनी सहा ते आठ या वेळस श्रमदान करावे तथा ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या नावाचे एक झाड देऊन,लावुन मदत करावी असे आवाहन या सर्व निसर्गप्रेमी संघटनांच्या वतीने पुसदकरांना करण्यात येत आहे. चाणक्य कोचिंग क्लासेस नितीन मारकडसर यांच्या कडून दिनांक चोविस सप्टेंबर रोजी एक झाडाची लागणारी किंमत देऊन आठ फुटाचे आंब्याचे झाड लावून त्याला सुरक्षा गार्ड लावण्यात आले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..