मंत्री सत्तारांची ‘सही’साठी घाई, अजित पवार म्हणाले नाही…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबाद महापालिकेच्या वतीने आज (दि. १६) वंदे मातरम् सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यात व्यासपीठावरच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी घाईगडबड करीत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यापुढे एक फाईल सादर केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पवार यांनी फाईलवर स्वाक्षरी करणे टाळले. त्यामुळे सत्तार नाराज होऊन सभागृहाबाहेर पडले.
यावेळी सास्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. एकीकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सुरु असताना दुसरीकडे मात्र व्यासपीठावर उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री सत्तार यांच्यात एका विषयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी अचानक सत्तार यांच्या स्वीयसहायकांनी एक फाईल त्यांच्याकडे दिली. अन् सत्तार यांनी ती उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढे केली. मात्र पवार यांनी नकार देत फाईल परत केली. यामुळे नाराज सत्तार सभागृहातून निघून गेले.
दरम्यान, सत्तार यांनी एवढ्या घाईघाईत नेमकी कोणत्या कामाची फाईल उपमुख्यमंत्री पवार यांच्यापुढे सादर केली. आताच त्या फाईलवर स्वाक्षरी का हवी होती. असे सवाल उपस्थित होत आहेत. मंत्री सत्तार यांच्याशी पत्रकरांनी संपर्क साधला असता, बोलण्यास नकार देत ते निघून गेले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….