बिबट्याने केली दोन महिन्यात दहा प्राण्यांची शिकार
पोहंडूळ शिवारात बिबट्याचा मुक्त संचार ; तरीही वनविभाग सुस्तच ; प्रहारच आंदोलनाचा इशारा
रियाज पारेख ९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव तालुक्यातील काळी दौ. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पोहंडुळ शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे.गोठ्यात बांधून असलेल्या शेतकऱ्यांची पाळीव जनावरे बिबट्या फडसा पाडत आहे. मागील दोन महिन्यात बिबट्याने तब्बल १० प्राण्यांची शिकार केली आहे.तरीही काळी वनविभाग सुस्तच असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
काल मध्यरात्री शुक्रवारी बिबट्याने गोठ्यात बांधून असलेल्या गाईच्या वासरावर हल्ला करत वासरा चा फडशा पाडला नंतर शेतात असलेल्या कुत्र्याला फस्त केले.शेतकरी बळीराम डोंगरे रा. दहिसावळी यांचे शेत पोहंडूळ शिवारात आहे. नेहमीप्रमाणे सर्व जनावरे शेतातील गोठ्यामध्ये बांधून होते. रात्रीला बिबट्याने हमला करून एका वासराची व दोन पाळीव कुत्र्यांचे शिकार केले.एवढेच नाहीतर
मागील आठवड्यापूर्वी याच बिबट्यांनी लक्ष्मण रावते यांच्या शेतातील गोठ्यामध्ये बांधून असलेल्या गायीची शिकार केली. गाईवर हल्ला करून बिबट्याने पार्श्व भागाकडील मास फस्त केले. तेव्हा लगेच शेतकऱ्यांने वन विभागाला या घटनेची सूचना दिली. वनरक्षक अविनाश राठोड यांनी लक्ष्मण रावते यांच्या शेतात भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गाईच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले होते.चार महिन्यापूर्वी सुद्धा पोहंडुळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून अनेक पाळीव जनावरे गावातील श्वानांचा शिकार घेतली. गजानन सोळंके यांच्या शेता मधील गोठ्यातील एका वासरांचा फडशा पाडला होता. एवढ्या मोठ्या घटना घडून सुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेल्या वनविभाग झोपेचे सोंग घेत आहे.त्यामुळे काळी दौ. वनपरिक्षेत्र विभागातील अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांनी
प्रश्नचिन्ह उभा केला आहे. एखाद्या नागरिकां चा बळी गेल्यानंतरच वनविभाग जागे होणार का ? असा सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहे.
*************************************
बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करू : सुनील आखरे
मागील काही दिवसात बिबट्याने केलेली शिकार चिंताजनक आहे.रात्री बे रात्री शेतात काम करणारे शेतकरी भयभीत झाले आहे.त्यामुळे शेतात शेतकरी जाण्यास घाबरत आहेत.वनविभाग जर बिबट्याचे येत्या ८ दिवसात बंदोबस्त केला नाहीतर लॉकडाउन व संचार बंदीतही उग्र अंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार तालुका संपर्क प्रमुख सुनिल आखरे (रा. पोहंडूळ)
यांनी दिला आहे.