मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही.
फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही.
महाविकास आघाड सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित होतं.
दरम्यान ईडीने सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेतली नाही. त्यामुळे मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….