उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सहन करावे लागते खुप त्रास ; याला जवाबदार कोण…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- जनसामान्य गोरगरीब रुग्णांचं आधारवड असलेलं पुसद शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे मागील काही दिवसांपासून अनेक प्रश्नांच्या विळख्यात सापडलेले आहे.कधी डॉक्टर उपलब्ध नाहीत..? तसेच औषध पण उपलब्ध नसतात व त्यात रुग्णालयातील स्वछता गृहांची दैनावस्थाच..! याला जबाबदार कोण…?
रुग्णालयाच्या दैनावस्थेला वाली कोण…?
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणार्या बदलामुळे शहरासह ग्रामीण भागात डोळ्याच्या साथीच्या आजारा, सर्दी , खोकला, ताप अशा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, येथील अस्वच्छता बघून रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. रुग्णांच्या जीवाशी एक प्रकारे खेळच सुरु असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शासकीय उपजिल्हा रुग्णालय मध्ये गर्भवती महिलांचे सिजर करणे एक अवघड प्रश्न झाला आहे.सर्व सोयी सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे वैद्यकीय अधिक्षक यांना करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड.मिर्झा आदिल बेग,फिरोज खान जिल्हा महासचिव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….