‘एटीएम’मध्ये बॉम्ब असल्याची खबर देणाऱ्याला पोलिसांनी चांगला प्रसाद दिला ; कारण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- काही कारण नसताना पोलिसांना कामाला लावल्याची घटना कामठी येथे घडली असून अशाच एका रिकामचोटाला पोलिसांनी चांगलीच बत्ती दिली. आयसीआयसीआय बँकेच्या ‘एटीएम’मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन त्याने कंट्रोल रुमला केला होता.
कामठी पोलिसांची काहीकाळ तारांबळ उडविणारी घटना सोमवारी रात्री घडली. गांधी चौकाजवळील एटीएमच्या रूमचे भाडे न मिळाल्याने दुकान मालकाने सोमवारला दुकानाचे शटर बँकेला सूचना देऊन बंद केले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास येथील गणेश लेआऊट येथे राहणारा मुकेश मुन्नालाल बागडे (४७) याने कंट्रोल रूमला फोन करून केला.
‘एटीएममध्ये बॉम्ब ठेऊन शटर बंद करण्यात आले आहे’ अशी माहिती मुकेशने पोलिसांना दिली. फोन येताच पोलिसांनी एटीएमचा शोध घेतला. एटीएम असलेल्या दुकानाचे शटर बंद असल्याने दुकान मालकाला विचारपूस करण्यात आली. सत्यता तपासल्यानंतर फोन करणाऱ्याला संपर्क केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्याने पोलिसांना भेटण्यास नकार दिला. अखेर मोबाईल लोकेशनचा आधार घेत पोलिस बसस्थानकाजवळ पोहचले. मुकेश सुदाम टॉकीजच्या समोर पोलिसांना मिळाला. त्याला चांगला प्रसाद दिला. रस्त्यावर काय सुरू आहे हे लोकांना कळत नव्हते. मुकेश दारू पिऊन असल्याचे समजल्यानंतर त्याला मारहाण केली नाही. त्याच्याविरोधात कामठी पोलिसांनी १८२, १७७, ५०५ (१)(ब), ५०६(२) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….