”वंदे भारतला माझा विरोध नाही, पण माझ्या मतदारसंघात…” सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर हल्ला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर लोकसभेमध्ये चर्चा सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांवर टीकास्र सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी निवेदन केलं.
खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, सध्या देशामध्ये भाजपकडून तत्त्वहीन पॉलिटिक्स सुरु आहे. पार्टी विथ डिफरन्स कुठं गेलं? देशामध्ये यूपीए सरकार असतांना मुलभूत गोष्टींच्या किंमतींवर नियंत्रण होतं. मात्र आज महागाई गगनाला भिडली आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे, मात्र ते खोटं आहे. कोणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ते सरकारने स्पष्ट करावं. कांदा, दूध याबाबत सरकार जागरुक नसून कांद्याची निर्यात केली जात नाही आणि दूध आयात केलं जात आहे.
”भाजपने ९ वर्षांमध्ये ९ सरकारं पाडली आहेत. देशात राजकारणाचा स्तर घसरला आहे. जुमलेबाजी सुरु आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. नोटबंदीनंतर चलनातील नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे, मोदी सरकारने कोणतीही आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत” असं सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनबद्दल मला काही बोलायचं नाही. ही चांगली गोष्ट आहे परंतु गरीबांच्या ट्रेनचं काय? माझ्या मतदारसंघात तीन रेल्वे स्थानकं आहेत परंतु एकही रेल्वे थांबत नाही. यूपीएचं सरकार असताना दहा-दहा ट्रेन थांबत होत्या. वंदे भारतला माझा विरोध नाही परंतु गरीबांच्या ट्रेनकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
मणिपूर प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या, मणिपूर हिंसाचारचं प्रकरण गंभीर आहे. ज्यांची नग्न धिंड काढली त्या कुणाच्यातरी बहीण होत्या, आई होत्या. सरकारला मात्र मणिपूरचं काही देणंघेणंच नाही असं दिसून येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..