राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं…! लोकसभेत ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असा पुनरुल्लेख….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अविश्वास प्रस्तावार बोलतांना इंडिया आघाडीत प्रमुख पक्षांवर शरसंधान साधलं.
अविश्वास प्रस्तावानिमित्त आज लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी काँग्रेसनं मणिपूरच्या विषयावर पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचे आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी हे प्रश्न विचारले.
दरम्यान, निशिकांत दुबे बोलताना म्हणाले की, जे पक्ष एकमेकांशी लढले त्यांनी आज ‘इंडिया’ नावाने आघाडी काढली आहे. काँग्रेसने लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये पाठवलं, मुलायमसिंह यादवांवर दाखल झालेल्या सीबीआयच्या केसेस आम्ही केलेल्या नव्हत्या, शेख अब्दुल्लांना काँग्रेसनेच २२ वर्षे जेलमध्ये ठेवलं होतं.
पुढे बोलतांना दुबे म्हणाले की, पंतप्रधानांनी आणि आमच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी अन् नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं आहे. परंतु ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केली होती. १९८० मध्ये शरद पवारांच्या सरकारला काँग्रेसने बरखास्त केलं शिवाय काँग्रेसला वैतागूनच शरद पवारांनी नवीन पक्षाची स्थापना केलेली होती. तरीही हे लोक आज एकत्र आलेले आहेत.
शरद पवारांवर भाष्य करतांना निशिकांत दुबे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टिपण्णी केली. सोनिया गांधींना मुलाला सेट करायचं आहे आणि जावयाला भेट करायचं आहे, असं म्हणत त्यांनी सोनियांवर टीकास्र सोडलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..