राजीनाम्यासाठी उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- उपसरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून सरपंचासह इतरांनी महिला उपसरपंच व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी युवकाचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला.
निखिल रमेश कांबळे असे मृत युवकाचे नाव आहे. मृत्युमुखी पडलेल्या निखील यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी तीन महिलांसह ५ जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात पोलीस फौजफाटा तैनात असल्याने तणावपूर्ण शांतता आहे.
ब्राह्मणगावात ५ ऑगस्टला झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या उपसरपंच शशीकलाबाई रमेश कांबळे यांनी परभणी रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेला जबाब सेलू ठाण्यास रविवारी रात्री उशिरा मिळाला. या फिर्यादीत आरोपी सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व रा. ब्राह्मणगाव) यांनी शशिकलाबाई यांना उपसंरपचपदाचा राजीनामा दे, या कारणावरून शिवीगाळ करून तिच्यासह तिचा पती व मुलास लाथाबुक्क्याने मारहाण केली. फिर्यादीचा मोठा मुलगा निखिल रमेश कांबळे यास रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने त्याचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. या गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार आरोपी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्याविरुद्ध सेलू ठाण्यात रविवारी मध्यरात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे तपास करीत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..