खासदारकी परत मिळाल्यावर राहुल गांधींना काय काय मिळणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावा संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांनंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
याचबरोबर राहुल गांधींना खासदारकी परत मिळाली आहे. आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यावर त्यांना कोण कोणत्या सोयींचा लाभ घेता येऊ शकतो असा प्रश्न कित्येकांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना १२ ‘तुघलक लेन’ हे जे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते ते परत मिळू शकते. गांधी हे ३ टर्म खासदार आहेत यामुळे यांना प्रकार ७(Type 7) चा बंगला मिळणार आहे.
राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाल्याने त्यांना सहाय्यक(पी.ए) व चालक (ड्रायव्हर) यांच्यासारख्या सेवा व विविध भत्ते मिळणार आहेत. खासदारांना दरमहा एक लाख इतका पगार मिळतो. हा भत्ता आता राहुल गांधींना मिळणार आहे.
यावेळी राहुल गांधींना प्रवास भक्ता, रेल्वे मोफत प्रवास, सदस्य प्रवास सुविधा, विशिष्ट परिस्थितीमध्ये विमान प्रवासाची सुविधा, मतदारसंघ भत्ता आणि पेन्शन मिळणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..