खान हसनैन आक़िब यांना 2022 चा ‘शान-ए-गझल’ पुरस्कार ; हसनैन आक़िब शिवाय समकालीन उर्दू ग़ज़ल चा चित्र धूसर :- डॉ. गणेश गायकवाड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सन्मान आणि पुरस्कार हे प्रत्येक कवि, कलाकार आणि लेखकाच्या योगदानाबद्दल त्याच्या ओळखीचे प्रतीक मानले जातात. पुरस्कारामुळे एखाद्या व्यक्तीला समाजाने आपल्या योगदानाचे कौतुक केले आहे, असे वाटू लागते. अन्यथा, त्याला कोणत्याही पुरस्काराची गरज नसते, त्याचा सर्जनशील प्रवास पुरस्काराशिवायही सुरूच असतो, यात काही दुमत नाही. पण समाजाने एखाद्या कलाकाराला किंवा कवि अथवा लेखकाला पुरस्कार देऊन त्याच्या योगदानाची दखल घेतली तर त्याच्या मेहनतीला सार्थक वाटतं।
अलीकडेच सहर-ए-ग़ज़ल अकादमी आणि हिंदू मुस्लिम एकता मंच, बुलढाणा (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने उपखंडातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, संशोधक आणि अनुवादक प्रा. खान हसनैन आक़िब यांना वर्ष 2022 साठीचा ‘शान-ए-ग़ज़ल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नामवंत लेखक आणि साहित्यिकांचा समावेश असलेल्या समितीने हसनैन आक़िब यांच्या उर्दू ग़ज़ल साठी प्रदीर्घ योगदानाबद्दल सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे। या संदर्भात गायकवाड सभाग्रह, बुलढाणा येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि सहर-ए-ग़ज़ल अकादमीचे अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड उर्फ़ आग़ाज़ बुलढानवी यांनी आपल्या प्रास्ताविकात हसनैन आक़िब यांच्या प्रदीर्घ साहित्य योगदानावर प्रकाश टाकला आणि सांगितले की, हसनैन आक़िब हे उर्दू ग़ज़ल च्या क्षेत्रात समकालीन प्रातिनिधिक कवींपैकी एक आहेत. त्यांचा उल्लेख न करता समकालीन उर्दू ग़ज़लेचा चित्र धूसर दिसते. कार्यक्रमाचे अध्यक्ष काज़ी रियाज़ अन्वर यांनी रुबाबदार रूपाचे कौतुक करताना हसनैन आक़िबसारख्या व्यक्तीची शान-ए-ग़ज़ल पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल सहर-ए-ग़ज़ल अकादमीचे अभिनंदन केले। ते म्हणाले कि जर कोणी व्यक्ति तीस वर्षापेक्षा जास्त काळापासून कोणत्याही बक्षीस किंवा स्तुतीची अपेक्षा विना सतत साहित्याची सेवा करत असेल अणि उर्दू भाषा आणि साहित्याला जगभरात प्रतिष्ठित स्थानावर नेत असेल, तर अनेक मोठ्या शासकीय अथवा अशासकीय पुरस्कारांवर त्याचा हक्क आपोआप सिद्ध होऊन जाते.
उपखंडातील नामवंत असे एक उत्तम कवी, लेखक, शिक्षक आणि अनुवादक म्हणून हसनैन आक़िब यांच्या परिचयाची गरज नाही. त्यांनी आपल्या शहर यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद चा नाव जागतिक नकाशावर नेऊन ठेवला आहे. आता पर्यंत ‘रम-ए-आहू, ख़ामा सजदा-रेज़, कम-ओ-बेश, ते-से-तन्क़ीद, अस्मां-कम-है, इक़्बाल-बेह-चश्म-ए-दिल, यासह विविध विषयांवर सुमारे वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हसनैन आक़िब यांच्या साहित्यिक योगदानाला अनुसरून’ हमा आफ़ताब बीनम, तहरीर-पस-ए- तहरीर (संकलक: मोहसीन साहिल) आणि’ पेश पेश’ (संकलक: फरमान अहमद खान) हे पुस्तकही प्रकाशित झाले आहेत.
ते विविध शासकीय आणि अशासकीय साहित्यिक आणि अध्यापन समित्यांचे सदस्यही राहिले आहेत। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी उर्दू भाषेचे प्रतिनिधित्व केले आहे। अनुवादक म्हणूनही त्यांची ख्याती आहे।
त्यांनी भाषांतराच्या क्षेत्रात ”रिफ्लेकटिव ट्रान्सलेशन’ ही संज्ञा तयार केली आणि प्रचलित केली, उर्दू व्यतिरिक्त, हसनैन आक़िब फारसी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही दर्जेदार कविता आणि गद्य सृजन करतात.
ते या पुरस्काराबद्दल व्यवस्थापन समिती आणि पुरस्कार समितीचे आभार व्यक्त करतांना म्हणाले की कोणताही पुरस्कार हा एखाद्या व्यक्तीला दिला जात नाही, तर व्यक्तिमत्त्व आणि संबंधित क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदान अणि सेवांना दिला जातो, असा झाला तरच त्या पुरस्काराची प्रतिष्ठा टिकून राहते। नाहीतर पुरस्कार विनोदच ठरतात।
हसनैन आक़िबच्या शब्दांचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. येथे नमूद करणे योग्य ठरेल की हा पुरस्कार दरवर्षी एका नामवंत कवीला दिला जातो, ज्यामध्ये शाल, रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि ट्रॉफी असते।
पुरस्कार वितरण समारंभानंतर एक महफिल-ए-मुशायराही आयोजित करण्यात आला होता, ज्याचे सूत्रसंचालन मनव्वर खान यांनी केले। डॉ.सदानंद देशमुख, हारून मास्तर व सय्यद आसिफ (हिंदू मुस्लिम एकता मंच व नगरसेवक) विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। मुन्तज़िम रौनकाबादी यांनी पवित्र कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर अज़ीम रॉयपुरी यांनी नात सादर केली। या मुशायरात आपले शेर व कविता सादर करणाऱ्या कवींमध्ये डॉ. गणेश गायकवाड, मुजीब खान, समीर बुलढानवी, आक़िब ज़मीर, आसिफ मुनव्वर, साक़िब शहाब, यासीन तन्हा, अमर चंद कोठारी, विशाल मोहिते, अज़ीम रायपुरी, मुजीबूर रहमान क़मर, अब्दुल ग़फ्फार आतिश, आरिफ जमां बालापुरी, हसनैन आक़िब आणि काज़ी रियाज़ अन्वर यांचा समावेश आहे.
श्रोत्यांनी सर्व कवींचे कौतुक केले व त्यांना भरभरून प्रतिसाद दिला। युवा कवी आक़िब ज़मीर यांनी समारंभ व मुशायरातील सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हसनैन आक़िब यांना शान-ए-ग़ज़ल पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य वर्तुळात सर्वत्र हर्षोल्लासाचा वातावरण आहे…

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..