विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे जोरदार लॉबिंग, सतेज पाटलांच नाव आघाडीवर…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेसने विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदानंतर आता विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या 9 विधान परिषद (Vidhan Parishad) आमदारांपैकी सहा आमदारींनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता देखी सूत्रांनी वर्तवली आहे. काँग्रेसकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातील बदलेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी मधील समिकरणे देखील बदलली आहे. नुकतेच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विधान सभेचे विरोधी पक्षनेते झाले. आता यानंतर काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदावर देखील दावा सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोध पक्षनेते आहेत. काँग्रेसच्या या नव्या मागणीनंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटल्यानंतर दोन्ही सभागृहातील संख्याबळाचे गणित बदलले.
आता महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळेच काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून सतेज पाटील, अभिजीत वंजारी आणि राजेश राठोड या तीन विधान परिषदेच्या आमदारांची नावे विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे विधान परिषदेतील संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे 9 आमदार आहेत. तर ठाकरे गटाकडे 8 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 4 आमदार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..