राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार..? काँग्रेसनं केली तयारी, लोकसभा अध्यक्षांना..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राहुल गांधींनी मोदींच्या आडनावाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्याचं मान्य करत गुजरात उच्च न्यायालयाने दोषी मानले होते. त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती. त्यामुळे त्यांची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती.
मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यानुसार काँग्रेसनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
गुजरात न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती गवईंच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर झाली. सुनावणीनंतर निकाल देताना राहुल गांधींना सर्वाधिक शिक्षा देण्याची गरज नव्हती, असं न्यायमूर्तींनी नमूद केलं. तसेच, सर्वाधिक शिक्षा देण्याचं कोणतंही सबळ कारण गुजरात न्यायालयानं नमूद न केल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना दोषी मानण्याच्या आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधींची खासदारकी पुन्हा पूर्ववत दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काँग्रेसच्या खासदारांनी आज लोकसभेत यासंदर्भात मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी खासदारकी परत दिली जावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.
“सरकार टाळाटाळ करेल, पण.”
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत लवकच येईल. आम्हीही तयार आहोत. पण यात सरकारकडून टाळाटाळ करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे की त्यांच्या हातात सर्व कागदपत्र आल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा”, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.
“राहुल गांधींविरोधात कारस्थान रचून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे राहुल गांधींविरोधात जे निरर्थक कारस्थान करण्यात आलं होतं, ते निष्फळ ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही संसदेत राहुल गांधींना खासदारकी परत देण्याची मागणी केली”, असंही अधीर रंजन चौधरी यांनी नमूद केलं.
राहुल गांधी अविश्वास ठरावावर लोकसभेत बोलणार?
“सरकारविरोधात आम्ही जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्यावर राहुल गांधींनी स्वत: भूमिका मांडावी. सगळ्या देशाला हे कळायला हवं की कशा पद्धतीने सत्ताधारी पक्ष राहुल गांधींविरोधात कारस्थान करत आहे”, असंही ते म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..