रात्रीचे शिळे अन्न खाऊ घातल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा; पुसद तालुक्यातील हूडी येथील घटनेने सर्वत्र खळबळ ; हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करा :- बिरसा मुंडा ब्रिगेड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- गिरधारी महाराज व्हीजेएनटी आश्रम शाळा हुडी तालुका पुसद चे विद्यार्थी यांना आज सकाळी मळमळ उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विषबाधेचा प्रकार समोर आला आणि सर्वांनी पुसद येथील खाजगी तथा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. अत्यावस्थ मुलांना आवश्यक ते उपचार देऊन दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सुद्धा या बाबीची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांना विचारपूस सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून दिल्याने पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांच्या परिस्थिती अचानक गंभीर झाल्याचे सांगितले. हा प्रकार अन्नातून विषबाधेचा प्रकार लक्षात येतात सर्वांचीच तारांबळ उडाली. तर या प्रकरणाची गंभिर दखल घेत तहसिल प्रशासनाने आश्रमशाळा गाठली आहे.
हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल :- बिरसा ब्रिगेड…
या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांना जीवास धोका निर्माण झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आश्रम शाळा प्रशासनावर व हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी दिला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..