महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री…? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. छत्तीसगडमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल हे छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यपाल रमेश बैस यांची छत्तीसगडमध्ये मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळं बैस यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा अशी मागणी भाजपमधील लोकांकडून होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला होता. डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी मोठा धक्का बसला होता. भाजप पक्षश्रेष्ठी देखील रमेश बैस यांच्यावर विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..