लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही, ओम बिर्लांनी जाहीर केलं ; काय आहे कारण..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. विविध मुद्द्यांवर संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरु आहे. लोकसभेत मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत.
आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी बिर्ला संसद भवनात असूनही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले नाहीत. पक्ष आणि विरोधी पक्षातील सदस्यांवर नाराजी व्यक्त करत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आपला निर्णय सांगितला.
सभागृहात शिस्तीचं पालन होत नाही, तोपर्यंत आपण अध्यक्षांच्याच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी सांगितले. सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सभागृहांची मर्यादा राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची वागणूक सभागृहाच्या परंपरांच्या विरोधात आहे.
मंगळवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच सभापतींच्या खुर्चीकडे पत्रकंही फेकली. विरोधी खासदारांनी मंगळवारी ज्या प्रकारे गोंधळ घातला त्यामुळे सभापती ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत.
ओम बिर्ला यांची लोकसभेत येणंही टाळलं
मंगळवारी दिल्ली सेवा विधेयकादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज चालू शकत नाही. ओम बिर्ला बुधवारी लोकसभेतही गेले नाहीत. विविध राजकीय पक्षांना कडक इशारा देताना ते म्हणाले, तुम्ही सभागृह सुरळीत चालू दिल्याशिवाय मी आत जाणार नाही.
दिल्ली सेवा विधेयकाला विरोध
मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडले. विधेयक मांडताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याने लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. दिल्ली सेवा विधेयकाला आम आदमी पक्ष विरोध करत आहे. यासोबतच काँग्रेससह भारताच्या विरोधी आघाडीच्या सदस्य पक्षांनीही याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..