शिवसेना नाव, पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. तसेच या गटासह त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.
तसेच शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्यालाच मिळायला हवं, असा दावा केला. हे प्रकरण पुढे निवडणूक आयोगाकडे गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. तसेच शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याची मान्यता दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केलेल्या सुनावणीत हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवलं आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
निवडणूक आयोगाने काय निकाल दिला होता?
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी निकल दिला. आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..