महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन्ही सुनावण्या लांबवणीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावण्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या दोन्ही याचिकांवरील उद्या होणाऱ्या सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत.
यामुळे ठाकरे गटाला या याचिकेवरील सुनावण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर उद्याही सुनावणी होणार नाही. त्याचबरोबर ठाकरे गटाने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणीही लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या 31 जुलैला सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या यादीत हे प्रकरण नाही. त्यामुळे या दोन्ही याचिकांवरील सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत.
सुनील प्रभू यांनी दाखल केली होती याचिका
दरम्यान, ठाकरे गटाने दाखल केलेली 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यावर उद्या सुनावणी होणार होती. उत्तरात विधानसभा अध्यक्ष कोणता मुद्दा मांडणार होते, ते समजणार होतं. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.
नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलं होतं मोठं भाष्य
शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयावर राहुल नार्वेकर निर्णय देणार होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार, असे म्हटले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..