अंदमान आणि निकोबार बेट हादरले; 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- भारतीय अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी रात्री उशिरा जोरदार भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 मोजली गेली आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने, ‘भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर असल्याचे सांगितले आहे.
तर तिकडे अफगाणिस्तानमध्येही काल संध्याकाळी भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी सकाळी 8.46 वाजता येथे भूकंप झाला होता. त्यानंतर ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

अरुणाचल प्रदेशात शुक्रवारी सकाळी 8.50 च्या सुमारास भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, अरुणाचल प्रदेशातील पैंगीनच्या उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. यापूर्वी 22 जुलै रोजी अरुणाचलच्या तवांगमध्ये 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..