माझ्या मतदारसंघाला 580 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती चुकीची :- जयंत पाटील…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला.
माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात 580 कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात 580 कोटी रुपये निधी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे निधी मागण्यासाठी मी कुणाला पत्रही लिहिले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी सभागृहात दिले. दरम्यान माझ्या मतदारसंघाला नियमानुसार जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र काही वृत्तपत्र या संदर्भातील चुकीच्या माहिती दिल्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, असे मत त्यांनी सभागृहात मांडले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, मला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. पुरवणी मागण्यांमध्ये मला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला हा गैरसमज आहे. हे आकडे खरे नाहीत, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..