गोंदियात तरुणाला टिप्परने चिरडले तरूण जागीच ठार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया :- दुचाकीने रस्त्याने जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला भरधाव वेगाने रेती भरुन नेणाऱ्या टिप्परने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा या गावा जाळल हि घटना सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. असुन या अपघातात युवक जागीच ठार झाला असुन मृतक युवकाचे साकेत शेंडे असे नाव आहे. मृतक हा हॉबीटोला सावरी येथील रहिवासी होता. या दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती तसेच काही काळ त्या परिसरात तणावाचे वातावरण हि निर्माण झाले होते. त्या वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली व टिप्पर चालक घटना स्थळवरून फरार झाला असुन पोलिसांनी फरार झालेल्या टिप्पर चालका विरुद्ध गोंदिया ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये गुना नोंद केला असुन, घटना स्थळी असलेला टिप्पर हि जप्त केला आहे.पोलीस फरार टिप्पर चालकाचा शोध घेत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…