तुर्कस्तान आज पुन्हा भूकंपाने हादरला, आतापर्यंत ४३०० मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
तुर्की :- गेल्या २४ तासांतील सलग चार भुकंपांनी तुर्की, सिरीया हादरला आहे. तुर्कस्तानमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रतारिश्टर स्केलवर ५.९ इतकी मोजली गेली.
याआधी सोमवारी तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीन जोरदार धक्के जाणवले. यापैकी पहिला भूकंप पहाटे ४ वाजता ७.८ रिश्टर स्केलचा होता. यानंतर ७.५ आणि ६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
भूकंपामुळे (Earthquake) येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तुर्कस्तानमध्ये अवघ्या 10 तासांत भूकंपाचे चार मोठे धक्के बसल्याने मोठा हाहाकार उडाला.
आतापर्यंत 4000 नागरिकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामध्ये किमान 4000 लोक मारले गेले आहेत आणि 20,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 10 शहरांमधील 1,700 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले. सीरियामध्ये किमान 783 लोक मारले गेले आणि 639 जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच तुर्कीमध्ये ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
भारताकडून मदत
भूकंपग्रस्त देशातील जनतेला मदत करण्यासाठी भारत यूरोपियन यूनियनच्या सोबत मदत पाठवणार आहे. भारत पाठवत असलेल्या विशेष मदतीत प्रशिक्षित डॉग स्क्वॉड आणि आवश्यक उपकरणांसह 100 कर्मचारी असलेली NDRF च्या 2 टीम पाठवणार आहे.