ठाकरे गटाच्या त्या बॅनर विरोधात केडीएमसीची कारवाई….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर साहेब मी गद्दार नाही.
या आशयाचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. हा बॅनर कल्याण डोंबिवली महापालिकेने काढला आहे. या प्रकरणात पोलिस गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
या बॅनरवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षात वाद होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची बाजारपेठ पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी महापालिका मुख्यालयाजवळ धाव घेतली. महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांनी हा बॅनर हटविण्याची कारवाई केली आहे. हा बॅनर आज सकाळपासून महापालिका मुख्यालयासमोर झळकत होता. हा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने लावण्यात आला होता. त्याठिकाणी बॅनरवर पक्षाचा उल्लेख असला तरी पदाधिका:यांचा नामोल्लेख नव्हता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!