आज पुसद येथे पत्रकार दिनानिमित्त माणुसकीच्या भिंतीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह , डायरी व पेन देऊन सत्कार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज पत्रकार दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व माणुसकीच्या भिंतीच्या नवीन उपक्रमा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या “अन्नदान सेवा” या वाहनाचे माननीय श्री आशिषभाऊ देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन तर्फे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा सन्मानचिन्ह,डायरी व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शेतीनिष्ठ शेतकरी श्री दत्तात्रय जाधव, प्रमुख पाहुणे माननीय ADV.श्री आशिष भाऊ देशमुख,आगार व्यवस्थापक पुसद श्री अभिजीत कोरटकर,सप्त खंजिरी वादक श्री पंकजपाल महाराज,ज्येष्ठ पत्रकार के.जी. चव्हाण सर,अध्यक्ष तालुका पत्रकार संघ- श्री अनिल चेंडकाळे, दिनकर गुल्हाने, दीपक हरीमकर,ललित शेता व तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव, सोहम नरवाडे,संतोष गावंडे, अनंता चतुर,पंजाबराव ढेकळे, शिवराम शेटे, देवानंद निळकंठ,प्रभाकर पाटील, धनंजय आघाम व दीपक घाडगे व सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….