नवाब मलिकांना दिलासा नाहीच ; तुरूंगातला मुक्कामही 14 दिवसांनी वाढला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांना दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र त्यांचा तुरंगातला मुक्काम 14 दिवसांनी वाढवत न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला.
यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मलिक यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ते आता पर्यंत जामिन मिळेल याच्या प्रतिक्षेत होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे
नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असली तरिही ते सध्या न्यायालयाच्या परवानगीने खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….