गुलाम नबी आझाद यांच बंड फसलं १७ नेते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जम्मू काश्मीरमधील पाच बड्या काँग्रेस नेत्यांनीही पक्षातील आपापल्य पदाचा राजीनामा दिला होता.
मात्र आझाद यांच्या नेतृत्वाखालील डेमॉक्रॅटिक आझादपक्षाचे राजकीय भवितव्य टांगणीला लागल्याचे दिसत आहे. कारण पक्ष स्थापन झाल्यानंतर निवडणुका होण्याआगोदरच पक्षाला गळती लागली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह १७ माजी काँग्रेस नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्येच प्रवेश केला.
यामुळे गुलाम नबी आझाद यांना धक्का बसला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. केसी वेणुगोपाल म्हणाले, ‘भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होण्यापूर्वी आमचे अनेक नेते स्वगृही परतत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
तारा चंद, राज्य काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पीरजादा मोहम्मद आणि अन्य १५ नेते काँग्रेसमध्ये परतले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, येत्या काही दिवसांत डीएपीचे आणखी अनेक नेते काँग्रेसमध्ये परतणार आहेत.
आझाद यांनी ऑगस्टमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यानंतर डीएपीची स्थापना केली. पक्ष स्थापनेनंतर काही आठवड्यांतच त्यात मतभेद सुरू झाले. अलीकडेच तारा चंद आणि अन्य काही नेत्यांची डीएपीतून हकालपट्टी करण्यात आली.
गुलाम नबी आझाद यांचा राजकीय पक्ष फुटला आहे. अनेक नेते एकापाठोपाठ एक आझाद यांच्या पक्षापासून निघून जात आहेत. आता हा राजकीय पक्ष संपुष्टात येताना दिसत आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….