अल्पवयीन मुलीचे अपहरण ; महिना उलटला शोध नाहीच ! आरोपी मोकाट ; प्रभारी ठाणेदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महागाव तालुक्यातील करंजखेड येथून आकरावित शिकत असलेल्या १७ वर्षीय मुलीचे गावातील २२ वर्षीय तरुणाने अपहरण केल्याची घटना (ता.१६ नोव्हे.) रोजी उघडकीस आली. पीडिते मुलीच्यावडिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी नितीन संजय चव्हाण रा. करंजखेड असे संशयित आरोपीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या बेडरूम मध्ये झोपली होती.सकाळी कॉलेज ला जाण्यासाठी तिच्या आईने तिला आवाज दिला.तिचा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आईने तिच्या बेडरूम मध्ये तिला पाहिलं मात्र ती मिळून आली नाही.सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.पीडित तरुणीच्या वडिलांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गंभीर प्रकरण असताना प्रभारी ठाणेदार हे कासवगतीने तपास करीत आहेत.त्यामुळे या प्रकरणाला सव्वा महिन्याचा कालावधी उलटला असला तरी मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.पोलीस तपासात चालढकल करीत असल्याने पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपीला पोलीस प्रशासन पाठबळ देत असल्याचा आरोप केला आहे.पोलीस आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना ? अशी शंका यावेळी उपस्थित केल्या जात आहे.त्यामुळे पोलिसांच्या संथगतीच्या तपासाविरोधात पीडित तरुणीच्या वडिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली आहे.न्याय मिळत नसल्याने आता हे प्रकरण पोलिसांविरोधात न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती पीडित तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….