महाराष्ट्र राज्यातील नगर पालिका व महानगर पालिकातील 500 शिक्षकांच्या आझाद मैदान , मुंबई येथे सामुहिक आत्मदहनाचा अर्जुन कोळी यांचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणजी सरनाईक यांना महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका महानगर पालिकातील सर्व शिक्षकांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य नपा व मनपा यवतमाळ जिल्हा जिल्हाध्यक्ष सुनील तुकाराम जाधव यांच्या कडून देण्यात आले.
मागण्या पूर्ण न झाल्यास 500 शिक्षक आत्मदहन करणार महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी इशारा दिला आहे.
शासनाकडून या शिक्षकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने राज्य शासनाने खालील विषय न सोडविल्यास दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी राज्यातील 10,000 शिक्षक आझाद मैदानावर लाक्षणिक आंदोलन करणार असून 500 शिक्षक आत्मदहन करणार आहेत.
येत्या विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या या मागण्यांबाबत प्रश्न मांडून सर्व शिक्षकांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.
शिक्षक आमदार किरणजी सरनाईक यांनी सुद्धा निश्चितच आपल्या मागण्यांना न्याय मिळेल व आपला प्रश्न विधिमंडळात उपस्थित करू अशा प्रकारचे आश्वासन दिले.
या मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान देणे, 2005 नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जिल्हा परिषद प्रमाणे नगरपालिका शिक्षकांना ऑनलाइन बदली पोर्टल उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद मध्ये केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये नगरपालिका महानगरपालिका मधील शिक्षकांचा समावेश करणे, जिल्हा परिषद प्रमाणे नगरपालिका महानगरपालिका मधील उच्चशिक्षित नेट सेट,पीएचडी धारक शिक्षकांची माहिती शासनाने संकलित करून उच्चशिक्षित शिक्षकांना
याप्रसंगी नगरपरिषद पुसद मधील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये उत्तम किसन जाधव, गजानन भोपाजी अंभोरे, मो मतिन मो अय्युब मारोती विठ्ठलराव ठेंगल, तानाजी दत्ता काळे, प्रवीण शामराव कांबळे ,शिवाजी रामराव होडगीर ,प्रसाद जयवंतराव महल्ले ,सुरज रामचंद्र गिरी, सय्यद मतीन सर ,सय्यद साजिद सर तथा महिला शिक्षिका कुमारी मंजिरी दहीकर ,कु पुष्पा सिहोतीया, कु मनीषा पडलवार , कु अर्चना म्हैसकर तथा अन्य शिक्षक वृंद उपस्थित होते..

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..