’50 खोके, एकदम OK’ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- आज सोमवार दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. करोना संकटानंतरचं नागपूरमध्ये होणारं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे नियोजन जवळपास 14 दिवसांचे आहे.
मात्र 24, 25 डिसेंबर अनुक्रमे शनिवारी, रविवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल, तर पुढे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी देखील रविवार, शनिवार असल्याने कामकाजास सुट्टी असेल. त्यामुळे एकूण 10 दिवस दोन्ही सभागृहांचे नियोजित कामकाज पार पडेल.
यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरुषांबाबतची अपमानास्पद वक्तव्ये, राज्यपालांचा राजीनामा, महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमकतेला आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार कसं तोंड कसे देणार हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान, हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात ’50 खोके, एकदम ओके..’ अशा घोषणा देण्यात आल्या आहे. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..