“निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, छगन भुजबळांकडून अधिवेशनात तीव्र नाराजी, म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ”, असं म्हणत छगन भुजबळांनी झालेला त्रास सांगितला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना आश्वासित केलं.
छगन भुजबळ म्हणाले, “रिझर्व्ह बँकेच्या जवळील रस्ता बंद करण्यात आला आहे. तेथे आम्हाला दुसरीकडून या असं सांगतात. त्यामुळे अर्धा तास वाहतूक कोंडीतून विधीमंडळात यावं लागतं. जागोजागी अडवणूक होत आहे. आमदारांना तिथून यायचं आहे, निदान आमदारांची गाडी तरी सोडा ना ओ.”
“सीमावादावर अधिवेशनात ठराव मांडून एकमताने मंजुर करा”
यावेळी भुजबळांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर एक ठराव मांडून तो एकमताने मंजुर करण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेळगाव-कारवारविषयी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं सभागृहाचं म्हणणं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी या अधिवेशनात त्यावर एक ठराव मांडावा आणि सगळ्यांनी तो एकमताने मंजुर करावा.”
भुजबळांना नार्वेकरांचं आश्वासन
भुजबळांनी अधिवेशनातच आमदारांच्या गाड्या अडवल्या जात असल्याची तक्रार केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भुजबळ यांना या प्रकरणी वाहतूक पोलिसांना सूचना केल्या जातील असं आश्वासन दिलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..