नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : आमदार आईसोबत अडीच महिन्याचे बाळ आले विधानभवनात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळासह विधान भवनात पोहोचल्याने लक्षवेधी ठरल्या.
मी आई आहे, सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. हे बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..