फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप…? शिंदे-फडणवीस सरकारबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं आहे.
या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थिती आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनादेखील बघणार नाही, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले, “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे.”
“महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? एक मिनिटही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. म्हणून हे सरकार उलथून टाकण्यासाठी हा इशारा आहे. महाराष्ट्राची ताकद काय आहे? हे आज दिल्लीसुद्धा दुर्बिणीतून बघत असेल. आज महाराष्ट्र जागा झालाय. आज महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आहे,” असंही राऊत म्हणाले.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”