आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा तापणार ; 21 डिसेंबरला विधानभवनावर ‘एमआयएम’चा भव्य मोर्चा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- राज्याचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होत आहे. यादरम्यान, 21 डिसेंबर रोजी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुस्लीमांना पाच टक्के आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

जलील यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मोर्चा नागपूरच्या इंदोर मैदानापासून निघणार असून विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील औरंगाबाद ते मुंबई असा एमआयएमकडून मोर्चा काढण्यात आला होता.
जलील यांच्या प्रमुख मागण्या –
1) मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे.
2)वक्फ बोर्डाच्या जागा सुरक्षित करणे आणि त्यावरील अनाधिकृत अतिक्रमण काढणे बाबत.
3)मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींचा अनुदान देण्याची मागणी.
4)झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे.
5)हातमाग आणि यंत्रमाग विणकरांना रोजगार देण्यासाठी आर्थिक मदत करावी.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..