मोठी बातमी…! अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे, पण देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला आहे. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high Court) एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावलर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. तेरा महिन्यांनंतर अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे, मात्र सध्या अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच असणार आहे.

पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम तुरुंंगातच
अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुखांना उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या विनंतीनंतर उच्च न्यायालयाने जामिनावर 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना देशमुखांचं पासपोर्ट प्रशासनाकडे जमा करणे, पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे पुढचे 10 दिवस अनिल देशमुख यांना तुरुंंगातच राहावं लागणार आहे.

शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….