अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परळी (बीड) :- ‘हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय…’
अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अप्पा… अशा शब्दात आ. धनंजय मुंडे यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
धनंजय मुंडे हे आज सकाळी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड या स्व. मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्व. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून भावनिक पोस्ट करत गोपीनाथराव मुंडे साहेबांची प्रेरणा व विचार हे लोककल्याणकारी होते, त्यांच्या स्मृती सतत आपल्याला प्रेरणा देत राहतील असेही म्हटले आहे.

शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….