पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न; काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यात टीकेची झोड उठली आहे. विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन केले जात आहेत.
आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असताना पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने त्यांना चिंचवड येथे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. तसेच, ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या कार्यकर्त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा आडवण्याचा चिंचवड स्टेशन येथे प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक, बहुजन समाजातील नेते आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असून त्यादरम्यान त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच सांगितलं जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….