ईव्हीएम घोटाळ्याचे सांगून काँग्रेस उमेदवाराचा मतमोजणी केंद्रावर आत्महत्येचा प्रयत्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गांधीधाम :- गुजरातमधील विधानसभेचे कल समोर येत असून यामध्ये भाजप बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. भाजप सध्या १५५ जागांवर आघाडीवर आहे. मात्र गुजरातमध्ये काँग्रेसला फारस यश मिळताना दिसून येत नाहीये.
काँग्रेस सध्या २१ जागांवर आघाडीवर तर आप १० जागांवर आघाडीवर आहे. मात्र ही मतमोजणी सुरू असतानाच गुजरातमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने मतमोजणी केंद्रावरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गुजरात विधानसभेत भाजप बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. तर या विरोधात काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांनी भापजवर गंभीर आरोप करत मतमोजणी केंद्रावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
गुजरातमध्ये भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव होताना दिसत आहे. त्यामुळे गांधीधामचे उमेदवार सोलंकी यांनी भाजपवर थेट ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप केलाय. तसेच त्यांनी आपल्या गळ्याला गळफास बांधत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आसपासच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, गुजरात विधानसभेत भाजपने मोठं यश संपादन केलेलं दिसून येत आहे. तर काँग्रेसला मात्र फारस यश मिळताना दिसत नाहीये. गेल्या विधानसभेत भाजपला ९९ जागा तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होईल, असं वाटत होतं. मात्र काँग्रेसला गेल्या विधानसभेत मिळालेल्या जागा इतक्याही जागा निवडून आल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.