“शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली..!” संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज ठाकरे गटात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेचे अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यातच आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगली बातमी समोर येत आहे. आज माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर,बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला.
माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर यांनी हाताल शिवबंधन बांधले. तर संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज व माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनील गजाधर राठोड यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थित सेनेत प्रवेश केला.

पक्ष प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेते येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येत आहेत. त्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबुत होत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज व माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव मा. श्री. अनील गजाधर राठोड यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश झाला.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’