महिलांबाबतचे आक्षेपार्ह विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तारांना भोवणार, कारवाईसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. सत्तारांच्या कृतीमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.
यासंदर्भात सर्वपक्षीय महिला आमदार व खासदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ते पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे. त्यामुळे हे प्रकरण सत्तार यांना भोवण्याची शक्यता आहे.
संभाजीनगरमधील सिल्लोड येथे झालेल्या एका जाहीर सभेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका करत शिवीगाळ केली होती. मंत्रीपदी असताना एका महिला नेत्याला शिवीगाळ करणाऱ्यां सत्तार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले होते. दरम्यान, महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक निवेदन सादर करत कारवाईची मागणी केली होती. याची दखल राज्यपालांनी घेतली असून उचित कार्यवाहीसाठी ते मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार फौजिया खान यांनी ट्विट करत दिली आहे.

विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?