“कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे”, छगन भुजबळांचा टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘महाराष्ट्राचा भाग असलेले बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या, नंतर बाकीच्या विषयांवर बोला कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’,’ असा टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांच्या नेत्यांना लगावला आहे.
भुजबळांनी आज (29 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडून आलेला समन्स आदी मुद्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्राचा भाग असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या नंतर बाकीच्या विषयांवर बोला असे सांगत जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्याची अशी भाषा कर्नाटक मधील नेत्यांनी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे.” पुढे भुजबळ म्हटले, “भारत हा एकसंघ देश आहे. शांततेच्या मार्गाने जर कुणी निदर्शने करत असेल तर त्यांच्यावर गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. बेळगाव मधील नेतेमंडळी कठोर आणि क्रूर अशी भूमिका घेत आहे ती अजिबात योग्य नाही. कर्नाटकमध्ये बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कर्नाटकमधील नेत्यांकडून होत आहे.”
राऊतांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना सुरक्षा पुरवावी
“जगात बेळगाव कारवारसाठी जवळपास साठ वर्षांहून अधिक काळ लढा सुरू आहे. हा केवळ देशातील नव्हे तर जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेला लढा आहे. हा प्रश्न लवकर निकाली निघण्याची आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येऊन हा लढा देण्याची नितांत आवश्यकता आहे.” “जत तालुक्यातील गावे आम्हाला द्या अशी कर्नाटक सरकारची मागणी म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला तुम्हाला काही द्यायचे नाही उलट घ्यायचे आहे. चुकीचे वक्तव्य करण्याचा कर्नाटक मधील काही नेत्यांचा प्रयत्न आहे. तसेच संजय राऊत यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर त्यांना शासनाने तातडीने सुरक्षा पुरवावी”, असे मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
कर्नाटक प्रश्नावर आम्ही वेश बदलून कर्नाटकात प्रवेश केला होता. त्यानंतर हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा लाठीचार्ज झाला यामध्ये अनेक लोक गंभीर जखमी झाले. त्यानंतर आम्हाला न्यायालयात नेण्यात आले आणि त्यानंतर दोन महिने तुरुंगात राहून सुटका झाली या आठवणींना उजाळा दिला.
केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना करावी
देशात जातनिहाय जनगणना करण्याची आमची पहिल्या पासून मागणी आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत मागणी केली होती. त्यावेळी पवार साहेबांच्या माध्यमातून शंभर हून अधिक खासदार एकत्र येऊन ही मागणी कायम केली. त्यावेळी करण्यात आलेली जनगणना चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. अद्यापही केंद्र शासनाने ती जाहीर केलेली नाही. लवकरात लवकर योग्य यंत्रणेच्या माध्यमातून जनगणना करून त्यातून ओबीसी समाजासह सर्व समाजाला आपले हक्क मिळतील.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….