उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; कृष्णा हेगडे शिंदे गटात, लगेच मोठी जबाबदारीही दिली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आतापर्यंत अनेक आमदार, खासदार तसेच पदाधिकांऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानण्यात येत आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांना उपनेतेपद तसेच प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपमधून शिवसेनेत कृष्णा हेगडे यांनी वर्षभरापूर्वीच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली.
ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शिवसेनेचं विभाजन झालं. आतापर्यंत कृष्णा हेगडे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आजा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान कृष्णा हेगडे हे काँग्रेसचे देखील आमदार राहिले आहेत.

वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….