नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत ; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पाटणा :- बिहारमध्ये गोपालगंज व मोकामा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार प्रचारात उतरलेले नाहीत; परंतु, आजवर जेव्हा जेव्हा त्यांची प्रकृती अस्वास्थ्य होत आली आहे, तेव्हा तेव्हा राज्याच्या राजकारणात वादळ आलेले आहे.
त्यामुळे राजदची चिंता वाढली आहे.
बिहारच्या राजकीय वर्तुळात नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची चर्चा सुरू झाली आहे. २०१७मध्ये नितीशकुमार यांची तब्येत बिघडली होती तेव्हा ते राजगीरमध्ये एक आठवडा विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव व त्यांचे वडील लालूप्रसाद यादव, आई राबडीदेवी यांच्या निवासस्थानी आयआरसीटीसी प्रकरणात छापेमारी करण्यात आली होती.
काही दिवसांतच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नितीशकुमार यांनी महागठबंधनचे सरकार पाडले होते व पुन्हा एकदा भाजपशी युती केली होती. यानंतर सरकारचे कामकाज सुरू असतानाच भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीपूर्वी नितीशकुमार कोरोना संक्रमित झाले होते. त्यावेळी बिहार दौऱ्यावर आलेले भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून चार हात लांब राहिले होते.
…तर राजदला नितीशकुमार यांची गरज उरणार नाही –
राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, नितीशकुमार यांचे प्रचाराला न जाणे राजदला महाग पडू शकते. कारण, यातून संदेश जात आहे की, नितीशकुमार राजदला विजयी करू इच्छित नाहीत. त्यामुळे आता राजकारणाचीही चर्चा सुरू झाली. या पोटनिवडणुकीत भाजप व राजद प्रतिद्वंद्वी आहेत आणि यातील एक- एक जागा दोघांकडे होती. दोन्ही जागा भाजपने जिंकल्या तर नितीशकुमार यांच्या धक्क्याला फार अर्थ उरणार नाही; परंतु, राजदने दोन्ही जागा जिंकल्यास समीकरण त्या पक्षाच्या बाजूने झुकू शकते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!