गुजरात निवडणूक: मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होणार ४ नोव्हेंबरला जाहीर ; केजरीवालांची घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सुरत :- आम आदमी पक्ष (आप) गुजरातच्या मुख्यमंत्री पदासाठीचा आपला उमेदवार येत्य़ा ४ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे.
ही घोषणा आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. उमेदवार कोण असावा, यासाठी त्यांनी जनतेचा कौल मागितला आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आपने भाजपविरोधात झुंज देण्याचे ठरविले आहे.
केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी आपतर्फे कोण उमेदवार असावा याबाबतची आपली पसंती लोकांनी आमच्या पक्षाला एसएमएस, व्हाॅट्सॲप, व्हाॅईस मेल, ई-मेलद्वारे ३ नोव्हेंबरपर्यंत कळवायची आहे. जनतेने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत दिलेला कौल आम्ही ४ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहोत. आपला गुजरातमध्ये मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.
‘भाजप जनतेचे मत विचारात घेत नाही’
अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातच्या काही मुख्यमंत्र्यांना भाजपने तडकाफडकी बदलले. मुख्यमंत्री बदलाबाबत भाजपने जनतेची मते विचारात घेतली नाहीत. मात्र, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेची पसंती लक्षात घेऊनच आपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविला होता.
९५ टक्के देणग्या एकट्या भाजपलाच : गेहलोत
निवडणूक रोख्यांमधून ९५ टक्के देणग्या एकट्या भारतीय जनता पक्षालाच मिळतात. देणगीदार भीतीमुळे इतर पक्षांना देणग्या देण्यास कचरत आहेत, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. दुसऱ्या पक्षाला देणगी दिली तर त्या देणगीदाराची चौकशी हाेते, असा आरोप गेहलोत यांनी केला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….